Realme नवीन स्मार्टफोन सिरीज Realme P3 भारतात लाँच केली आहे. कंपनीने या स्मार्टफोन सिरीज अंतर्गत Realme P3 Pro 5G आणि Realme P3x 5G हे दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. आता कंपनी या सिरीजअंतर्गत आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन Realme P3 Ultra या नावाने लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन याच महिन्यात भारतात लाँच केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
