Vivo T4x 5G मित्रांनो भारतामध्ये Vivo ने लॉन्च केला आहे त्यांचा नवीन T- सीरिज स्मार्टफोन यामध्ये 6500 mAh मोठी बॅटरी असून सोबत 50MP चा कॅमेरा आणि रिंग लाईट फ्लॅश दिलेला आहे. या स्मार्ट मध्ये AI पिक्चरही आहेत. चला तर आपण मग Vivo T4x 5g मोबाईल बद्दल माहिती जाणून घेऊ.
Vivo T4x 5G ची किंमत
Vivo T4x 5G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतीय बाजारात आले आहेत. फोनच्या बेस मॉडेलमध्ये 6GB RAM सह 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, ज्याची किंमत 13,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच 8GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. या फोनची विक्री विवोच्या वेबसाइटसह फ्लिपकार्टवरून केली जाईल. 12 मार्चला दुपारी 12 वाजल्यापासून हा फोन Pronto Purple आणि Marine Blue कलरमध्ये खरेदी करता येईल. पहिल्या सेलमध्ये फोनवर 1000 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळेल. ही ऑफर AXIS आणि HDFC बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यावर दिली जाईल. Vivo T4x 5G
Vivo T4x 5G डिस्प्ले स्पेसिफिकेशन
Vivo T4x 5G प्लास्टिक बॉडीसह येतो आणि त्याला IP64 रेटिंग देखील आहे, जे धूळ आणि पाण्यापासून संरक्षण देते. स्मार्टफोनमध्ये 6.72-इंचाचा IPS LCD पॅनेल आहे जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा डिस्प्ले 1050 nits पीक ब्राइटनेस ऑफर करतो.
Vivo T4x 5G बॅटरी
स्मार्टफोनमध्ये 6500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोन 44W FlashCharge सपोर्टसह लाँच करण्यात आला आहे. हा फोन 40 तास व्हिडीओ प्लेबॅक टाइम ऑफर करतो. Vivo T4x 5G
Vivo T4x 5G मोबाईल कॅमेरा
फोनच्या मागे ऑटो फोकससह 50MP चा AI मेन कॅमेरा देण्यात आला आहे, सोबत 2MP चा दुसरा सेन्सर पण मिळतो. फोनमध्ये रिंग लाइट आणि फ्लॅश देखील देण्यात आला आहे.
सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP चा कॅमेरा मिळतो. फोटोग्राफीसाठी यात नाइट, पोट्रेट, पेमो, डॉक्यूमेंट्स, स्लो मोशन, प्रो अ लाइव्ह फोटो सारखे फीचर्स मिळतात.